रत्नागिरी : धर्मादाय संस्थांमध्ये इन्कमटॅक्स कायद्याबाबत जागरूकता आणि तरतुदींची पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणी याबाबत आयकर विभागाने रत्नागिरी ब्रँच ऑफ आयसीएआयबरोबर आऊटरीच कार्यक्रम आयोजित केला.
या प्रसंगी कोल्हापूरचे इन्कमटॅक्स ऑफिसर (एक्झंप्शन) एकनाथ पाटील व सीए संजय व्हनभट्टे उपस्थित होते.
हॉटेल विवेक येथे आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सीए संजय व्हनभट्टे यांनी अर्थसंकल्पाचे विश्लेषण करत विविध बदलांची माहिती दिली. या कार्यक्रमाला सीए, करसल्लागार व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा सीए अभिलाषा मुळ्ये होत्या. उपस्थित सदस्यांनी सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत कार्यक्रम उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 24-02-2025














