रत्नागिरी : मिरजोळे येथे असलेले श्री देव सिद्धेश्वर मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ रोजी पहाटे ३ वाजता ब्रह्म मुहूर्तावर शिवमूर्ती पूजा विधी कार्यक्रम, स. ७ वाजता लघुरुद्र पूजा, स. ७.३० वाजता श्री सिद्धेश्वराची सवाद्य पालखी मिरवणूक, स. ८ वाजता श्री गंगापूजन अभिषेक, ८.३० वाजता शिवलीलामृत पोथी वाचन, सायं. ५ वा. आरती, ६ वा. भजन, ७वा. बालकलाकारांचा नृत्याचा कार्यक्रम, गुरुवार, दि. २७ रोजी सकाळी ८ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजन, रात्री १० वा. श्री जुगाई नमन मंडळ पानवल आंबेवाडी यांचे यमाच गर्वहरण नमन सादर होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 25/Feb/2025














