रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान केरळ येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली. मुहम्मद हाबीउल्लाह अब्दुल्ला हाजी (वय ७०, रा. कासारगोड, केरळ) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेतील खबर देणार आणि मुहम्मद हाजी हे व्यवसाय पाहण्यासाठी मुंबईला गेले होते. हे दोघेही पुन्हा केरळला जाण्यासाठी कुर्ला-मुंबई येथून गरीबरथ रेल्वेने प्रवास करत होते.
त्यांची गाडी मध्यरात्री रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली असता हाजी यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने हाजी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे खबर देणार यांना सांगितले.
खबर देणार यांनी रेल्वे पोलिसांना कॉल करुन माहिती दिल्यानंतर रुग्णवाहिकेतून हाजी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हाजी यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 27/Feb/2025














