रत्नागिरी : सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरातील जलतरण तलावाच्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, १ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास करण्यात आली. विराज सुधाकर खानविलकर (३६, रा. पॉवर हाउस नाचणे, रत्नागिरी) आणि सिध्दराज शरद रेडीज (३६, रा. शिवाजी नगर नरहर वसाहत, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाच्या बाजुला आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 03/Mar/2025