रत्नागिरी : केळये मजगांव म्हामूरवाडी गावाचे ग्रामदैवत श्री देवी नवलाई पावणाई, वाघजाई, काळकाई आणि देवी चंडीका मंदिराच्या जिर्णोध्दाराचा प्रथम वर्धापनदिन सोहळा येत्या ३ मार्चला साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केळये गाव रत्नागिरी शहरापासून १२ किमी अंतरावर वसलेले आहे. नैसर्गिक विविधतेने नटलेले हे शेतीप्रधान आहे. गावाला फार जुना इतिहास आहे. ग्रामदैवत श्री देवी नवलाई पावणाई, वाघजाई, काळकाई आणि देवी चंडीका मंदिराचा जिर्णोध्दार गतवर्षी ३ मार्च रोजी कलशारोहण उत्साहात साजरा करण्यात आला होता. या मंगलमय व पवित्र क्षणाचे स्मरण म्हणून या पहिला वर्धापनदिन ३ मार्च रोजी केला जाणार आहे.
वर्धापन दिनी सकाळी ८ ते १०.३० होम हवन महालक्ष्मी याग, ११ ते १२.३० सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ हळदीकुंकू कार्यक्रम होईल. संध्याकाळी ६ ते ८ स्थानिक भजने, रात्रौ १०.०० वाजता श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी [लयभारी] यांचे नमन सादर होईल. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थानने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 03-03-2025














