चिपळूण : शासनाकडून आरोग्य संस्थांसाठी २०२३-२४ साठी दिला जाणारा कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून ६० प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. या आरोग्य केंद्राला २ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
या बक्षीस योजनेत २४५ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व ३ उपजिल्हा रुग्णालय यांनी भाग घेतला होता. स्पर्धा एकूण तीन टप्प्यांमध्ये तीन-एक अंतर्गत मूल्यांकन व त्यानंतर बाह्य मूल्यांकन स्पर्धा घेण्यात आली. त्यामधून रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रोत्साहनपर पारितोषिक कापरे, दादर, शिरगाव, अडरे, खरवते या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आला. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र टेरवने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार मांडकी, बामणोली, निवळी, मुंढे उभळे, पिंपळीखुर्द, भिले, पेढांबे, निर्व्हळ, चिवेली, कोळकेवाडी, नांदिवसे, गुढे कळकवणे यांना देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय कामथे यांनी प्रोत्साहनपर पारितोषिक पटकावले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 04/Oct/2024
