राजापूर : तालुक्यातील पाचल-जवळेथर रस्त्याच्या दुतर्फा भरउन्न्हामध्ये झाडांची लागवड करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निश्चित केलेल्या ठेकेदाराकडून ही लागवड करण्यात आली असून, यामध्ये सुमारे तीनशे झाडांची लागवड झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली; मात्र तापमान वाढत असताना लागवड केलेली झाडे जिवंत राहतील का, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर झाडे लागवड थांबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
पाचल-जवळेथर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निश्चित केलेल्या ठेकेदाराकडून रस्त्याच्या दुतर्फा ही वृक्षलागवड केली जात आहे. त्यामध्ये सुमारे चारशे झाडांची लागवड करण्यात येणार असून, त्यापैकी सुमारे तीनशे झाडांची लागवड झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या झाडांना पाणी देण्यासह योग्य ती निगा राखण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ही झाडे जगतील का, अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे ही लागवडीची मोहीम थांबवण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 04/Mar/2025














