दापोली : जालगाव शाळा नं. १ मध्ये सायकल जनरेटरसह निर्धूर चूल

दापोली : दापोली तालुक्यातील जालगाव ग्रामपंचायतीत माझी वसुंधरा अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत जालगाव शाळा नं. १ मध्ये ग्रामपंचायतीतर्फे सायकल जनरेटर आणि निर्धूर चूल बसवण्यात आली.

अक्षय ऊर्जा विषयात शाळा स्वयंपूर्ण व्हावी, या उद्देशातून प्रथम सौरऊर्जेचा वापर शाळेत सुरू करण्यात आला तसेच विदयार्थांच्या शरीरातील ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी कसा करता येईल आणि अक्षय ऊर्जा कशा पद्धतीने अधिकाधिक वापरली जाईल, या उद्देशातून सायकल जनरेटर व निर्धार चूल शाळेत बसवण्यात आली. या वेळी सरपंच अक्षय फाटक, माझी वसुंधरा अभियानाचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, समिती सदस्य शिरीष देसाई, सतीश जोशी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण, सदस्य मयूर मोहिते, ग्रा. पं. सदस्य शोभा दांडेकर, ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे, शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणांची माहिती दिली. दापोली तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रत्येक शाळा ही अक्षय ऊर्जेमध्ये स्वयंपूर्ण व्हावी आणि नव्या पिढीला अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणजे काय याचे धडे मिळावेत. त्यातून वसुंधरेचा ढासळणारा तोल सांभाळण्यासाठी स्वयंपूर्ण पिढी तयार व्हावी, हा उद्देश आहे. – प्रशांत परांजपे, अध्यक्ष, माझी वसुंधरा अभियान, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 04/Mar/2025