मंडणगड : येथील दाभट बौद्धवाडी येथे राहणारे शेतमजूर श्री. दिनेश सखाराम कासारे यांच्या गोठ्यामध्ये शिरून वाघाने जनावरांवर हल्ला केला त्यामध्ये एका गाईला त्याने मारले. दिनेश कासारे हे भूमिहीन असून, छोट्याशा जागेत गाई पालन करतात. दुग्धव्यवसाय हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाच साधन आहे.
वाघाच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाल्याने या कुटुंबाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढे नुकसान भरून काढणे या कुटुंबासाठी केवळ अशक्य आहे. गोठ्याची व्यवस्थित व्यवस्था नसल्याने सलद्याच्या भिंती असल्याने वाघ आत मध्ये प्रवेश करू शकला. त्यामुळे या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढणे या शेतकऱ्यांसाठी केवळ अशक्य आहे. प्रशासन किंवा संबंधित वन विभागाकाढून काही मदत होईल. या चिंतेत सदर शेतकरी पडला आहे. प्रशासनाकडून काही मदत व्हावी ही आशा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 05/Mar/2025














