देवरुख : देवरुखातील तब्बल आठ मंडळे एकत्र येऊन चोरपऱ्या स्वच्छता अभियान रविवारी यशस्वीपणे झाले. या स्वच्छता अभियानात स्वस्तिक युवा प्रतिष्ठान, देवरुख, शैलेश क्रीडा मंडळ, कांगणेवाडी, अमृतनगर मित्रमंडळ, सन्मित्र नगर रहिवासी, जय हनुमान, कांगणेवाडी, जय हनुमान देवरुख, विजय प्रतिष्ठान, देवरुख, मार्लेश्वर मित्रमंडळ उत्स्फूर्त सहभागी झाले होते.
समाजातील विविध मंडळे आणि संस्थांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राववण्याची ही प्रेरणादायी सुरवात आहे. वसुंधरा वसाहत प्रवेशद्वारा जवळील पुलापासून (विसर्जन घाट) स्वच्छतेला प्रारंभ झाला. शांताराम कांगणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वच्छतेचा शुभारंभ झाला. या स्वच्छता अभियानात ५० ते ६० स्वच्छता दूत सहभागी झाले होते.
परिसरातील ज्येष्ठांसह सर्व स्तरातील नागरिक अभियानात सामील झाले होते. सकाळी अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता करताना प्रचंड प्रमाणात प्लास्टिक, डायपर, हगीज, कपडे, इ. टाकाऊ वस्तू निदर्शनास आल्या. चोरपऱ्या मध्ये बरेचसे गणपती विसर्जन घाट समाविष्ट आहेत. म्हणूनच सर्व मंडळांच्या प्रमुखांनी चोरपऱ्या स्वच्छता अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देवरुख नगरपंचायतींने आवश्यक ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था करावी. अन्यथा कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावीर, असे प्रत्येक मंडळातील प्रमुखांकडून मागणी करण्यात आली आहे. या अभियानासाठी देवरुख नगरपंचायतींचे मुख्याधिकारी विसपुते यांनी हँडग्लोव्हज् उपलब्ध करुन दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 06/Mar/2025














