आरोग्य यंत्रणेतील स्वच्छतेवर परिणाम नाही : डॉ. भास्कर जगताप

रत्नागिरी : स्वच्छतेच्या ठेक्याचे काम तूर्तास थांबवल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती; परंतु जुना ठेका सुरू असल्याने याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.

कोल्हापूर आरोग्यसेवा उपसंचालक मंडळाकडून रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला स्वच्छतेचा ठेका घेणाऱ्याविषयी आदेश प्राप्त झाला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सुधारित आदेश प्राप्त होईपर्यंत बी. एस ए. कार्पोरेशन लि. या कंपनीने काम सुरू करू नये, असे आदेशात म्हटले आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या साफसफाईसाठी दिलेल्या ३ हजार १९० कोटींच्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने कोल्हापूर आरोग्यसेवा उपसंचालक मंडळाकडून रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला स्वच्छतेचा ठेक्याच्या कामाला पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 06-03-2025

Shiva optical