रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने शनिवारी, दि. ८ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्रीमान यशवंत हरी गोखले भवन (वेधशाळेसमोर, नाचणे साळवी स्टॉप लिंक रोड, नाचणे) येथे होणार आहे.
महिलांचे निरामय जीवन या विषयावर डॉ. सौ. पल्लवी गद्रे (BHMS) मार्गदर्शन करणार आहेत. जरतारी काठ, नऊवारी थाट, अर्थातच नऊवारी नेसणे प्रात्यक्षिक सौ. श्रद्धा जोशी करणार आहेत.
कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला आहे. सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 08-03-2025












