वैदही रानडे यांनी रत्नागिरी जि. प. सीईओ पदाचा पदभार स्वीकारला

रत्नागिरी : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैदही मनोज रानडे यांनी आज (१०) पदभार स्वीकारला. त्या एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. रत्नागिरीचे सीईओ किर्ती किरण पुजार यांची बढतीने धाराशीव येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आली होती.

६ मार्च रोजी त्यांच्या बदलीच्या ऑर्डर्स निघाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

वैदही रानडे यांनी यापूर्वी रत्नागिरीत निवडणूक उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी आणि कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे प्रांताधिकारी म्हणून कामगिरी बजावली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील त्यांना माहिती आहे. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमध्येही त्यांनी नियोजनबध्द काम केले होते.

दरम्यान, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्यानंतर त्याने सर्व खाते प्रमुखांचे बैठक घेऊन आढावा घेतला.

Tata punch

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 10-03-2025