जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
रत्नागिरी, १२ जून (वार्ताहर): भंडारी समाज संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरी तालुक्यातील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी या उपक्रमाची अधिकृत माहिती दिली. समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार सोहळा रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० ते ६:०० या वेळेत ‘कित्ते भंडारी हॉल’, बंदर रोड, रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होणार आहे.
सत्कार सोहळ्यासाठी गुणांची पात्रता आणि निकष
या गुणगौरव सोहळ्यामध्ये इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसह उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. यासाठी मंडळाने खालीलप्रमाणे गुणांचे निकष निश्चित केले आहेत:
- इयत्ता १० वी: परीक्षेत ७५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी.
- इयत्ता १२ वी: परीक्षेत ७०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी.
- इतर पदव्या: ७०% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले पदवीधर, पदविका (Diploma), उच्च पदवीप्राप्त आणि विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणारे समाजातील विद्यार्थी.
गुणपत्रिका जमा करण्याचे आवाहन आणि संपर्क तपशील
गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कार सोहळ्यासाठी आपल्या गुणपत्रिकेची (Marksheet) छायांकित प्रत आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक संघाकडे जमा करणे आवश्यक आहे. हे अर्ज मंगळवार, ३० जून २०२६ पर्यंत संघाच्या ‘भागिर्थी भुवन’, खालची आळी येथील कार्यालयात पोहोचवणे गरजेचे आहे.
विद्यार्थी आणि पालकांना अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी संघाच्या खालील पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधता येईल:
- श्री. चंद्रहास विलणकर (सचिव): मो. नं. ९७६३८२४३११
- श्री. कांचन मालगुडकर (उपाध्यक्ष): ९४२२५७६७९६
- अँड. सौ. प्रज्ञा तिवरेकर (उपाध्यक्ष): ९४०५६७४८५०
- श्री. उदय हातिसकर (सहसचिव): ९६६५७२५५२५
वेळेत गुणपत्रिका जमा करून या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. राजीव कीर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 19-06-2026














