दापोली : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील पारा ३५ ते ३७ अंशात राहिला आहे. त्याचा परिणाम नागरी जीवनावरच नव्हे तर पशुपक्ष्यांवर झाला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असतो तर त्यानंतर उन्हाच्या झळांना सुरवात होते. परिणामी, दापोलीतील रस्ते दुपारी सुनसान होतात. दहावी, बारावीच्या परीक्षांबरोबरच कडाक्याच्या उन्हामुळेही पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. हिवाळा संपत आल्याचे संकेत मिळू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावर दिसणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे.

दापोलीत पारा रात्री १० अंशांखाली तर दिवसा ३५ ते ३७ अंशांपर्यंत वर जात आहे. मागील २४ तासांत कमाल तापमान ३६.० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १०.० अंश सेल्सिअस इतके आहे. सकाळी साधारण नऊ वाजेपर्यंत थंडी त्यानंतर कडाक्याचे ऊन अशी स्थिती आहे. दुपारी १२ से ४ वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके सहन करावे लागतात. गेल्या वर्षी याच दरम्यान कमाल तापमान ३३.५ तर किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस १० ते १५ वर्षामध्ये निसर्गसौंदर्याने येथील डोंगर जंगलतोडीमुळे उघडे पडू लागले आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला असून, मिनी महाबळेश्वर तापू लागले आहे. येथील तापमान आता ४० अंश पर्यंत जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमीमध्ये चिंता व्यक्त केली पूजात आहे. हिवाळा सुरु झाला की, परदेशातून कोकणात येणाऱ्या सीगल परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी थंड वातावरणामुळे सीगल पक्षी किनाऱ्यावर येतात त्यानंतर वे किनाऱ्यावरील सुरुवात निघून जातात. मागील आठवडयात हणे, मुरुड, पाळंदे या किनाऱ्यावर सीगल पक्ष्यांचे प्रमाण कमी दिसत होते. कदाचित ते उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागल्यामुळे परतीच्या प्रवासाला लागले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ब्रिटिशांच्या छावण्या
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ब्रिटिशांनी मिनी महाबळेश्वरात आपल्या सैनिकी छावण्या थाटल्या होत्या. दापोली हे कोकण्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. दापोलीचे निसर्गसौदर्य, थंड हवा, शांत समुद्रकिनारा ब्रिटिशांना भावल्याने दापोलीला छावणीचे रूप आले होते. दापोलीतील आझाद मैदान व आजूबाजूच्या परिसरात ब्रिटिश सैन्य व अधिकाऱ्यांच्या छावण्या होत्या. त्यामुळे याच मिनी महाबळेश्वरचे नाव ब्रिटिश पूर्वी कॅम्प दापोली म्हणून सुद्धा प्रचलित होते. ब्रिटिशकाळात दापोली शहरात पालिका होती; परंतु स्लोबल वार्मिंगचा फटका या मिनी महाबळेश्वरला बसलेला आहे.
उष्णतेच्या लाटेचा परिणाम पशूपक्ष्यांच्या जीवनावरही होत असतो. सीगल्सारखे अन्य भागातून आलेले पक्षी हिवाळा संपला की, हळूहळू परतीच्या प्रवासाला लागतात. मार्च महिन्यानंतर पक्ष्यांची संख्या कमी होऊ लागली की, लक्षात येते. त्या पक्ष्यांना परतीचा प्रवास करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळाली की, त्यांचा प्रवास सुरू होतो. एप्रिल, मेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू राहीत- मृगांक प्रभू, पक्षी अभ्यासक
राजस्थान आणि काश्मीरच्या सीमेवर सध्या बर्फवृष्टी होत आहे, अशी बर्फवृष्टी कधी होत नाही. आता सूर्य पृथ्वीच्या जवळ येत असल्यामुळे सध्या उष्णता वाढू लागली आहे. तरीही उत्तरेत सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे रात्री आणि सकाळी वातावरण थंड राहते- विजय मोरे, हवानान विभाग, कोकण कृषी विद्यापीठ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 11/Mar/2025














