चिपळूण : ‘वन विभागाची परवानगी घेऊनच ती झाडे तोडली’

चिपळूण : सती (ता. चिपळूण) येथील पुलाजवळ असलेल्या सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गाच्या परिसरात खासगी जागेतील झाडे शासनाची परवानगी घेऊन मालकाने तोडली आहेत. वन विभागाची अधिकृत परवानगी घेऊन खासगी जागेतील झाडे तोडण्यात आली आहेत. त्याला कोणाचाही विरोध नाही. असा दावा सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष युनुस अ. रहमान पठाईत आणि मुजावर आदम सरफुद्दीन चौगुले यांनी केला.

येथे कोणतीही देवराई नाही, जागामालकांनी दर्गासाठी दिलेल्या जागेतील झाडे तोडलेली नाहीत. पर्यावरणप्रेमींनी आरोप करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले. वाशिष्ठी नदीच्या किनारी सैय्यद सैफुल्ला बाबा यांची दर्गा आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. सर्व समाजातील लोकांचे हे एक श्रद्धास्थान आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 12/Mar/2025

Mahrashi karve ANM