रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ११ मार्च रोजी रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासदायक कार्यपद्धतीबाबत विविध विषयांवर चर्चा केली.
यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड तयार होण्यासाठी लागणारा वेळ, नवीन रेशन कार्ड मिळण्यास होणारा उशीर, रेशन कार्डावर नवीन नाव चढवण्यासाठी लागणारा बराच कालावधी, रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार, आरोग्य विषयक शासकीय योजनेचा लाभमिळण्यासाठी रेशन कार्डवर उत्पन्न दाखला मिळण्यास होणारी अडचण या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
जनतेला भेडसावणाऱ्या या सर्व अडचणींमध्ये आपण स्वतः लक्ष घालून समस्या लवकरात लवकर सोडवू, असे आश्वासन तहसीलदार म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाप्रमुख तथा शहर संघटक प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितिन तळेकर, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 13/Mar/2025














