रत्नागिरी : पडवे (ता. राजापूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात मुलींसाठी तायक्वांदो प्रशिक्षण व स्वसंरक्षण शिबिर पार पडले. शिबिरात प्रशालेतील १४५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेअंतर्गत तायक्वांदो व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण गेली ८ वर्षे राजापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये तायक्वांदो व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणाऱ्या राजापूर तायक्वांदो अॅकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे, महिला प्रशिक्षक श्रुतिका मांडवकर, रिचा मांडवकर, पूर्वा राऊत, गार्गी बाकालकर, यांच्यामार्फत देण्यात आले.
शिबिराची सांगता उपप्राचार्य मारुती भेंडवडेकर, वरिष्ठ अध्यापिका सौ. भेंडवडेकर आणि शारीरिक शिक्षिका सौ. शीतल यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आली. शिबिरासाठी प्राचार्य बसवराज यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी राजापूर तायक्वांदो अॅकॅडमीचे अध्यक्ष अभिजित जनार्दन तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, कोषाध्यक्ष सौ. मानसी दिवटे, सदस्य संजय मांडवकर, दीपक धालवलकर, संदीप राऊत, अद्वैत अभ्यंकर, नीलेश राहटे, दीपिका पवार, आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 13-03-2025














