निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. वाशिममधील पोहरादेवीत ते दर्शन घेतली. ‘बंजारा विरासत’ या वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन करतील.

नंतर ते मुंबईला येणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

मोदींवर निशाणा

सरकारी पैसा खर्च करून नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, ते भाजपच्या प्रचाराला येतात… तुम्ही पंतप्रधान आहात ना? तर तुम्ही सगळ्यांचे आहात. कोणा एका पक्षाचे नाहीत आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहात. तर मग पंतप्रधानपदाचे जोडे दिल्लीला काढून या. सरकारी यंत्रणा वापरून मोदी भाजपचा प्रचार करत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा. कारण हे सरकारी पैशाने पक्षाचा प्रचार करत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

संभाव्य मतदारसंघात दौरे करीत आहे. प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरत आहेत. निवडणूकीच्या दृष्टीने तयारी सुरु आहे. शिवसेना नेते देखील त्यासाठी फिरत आहेत. उत्तर महाराष्ट्र आघाडीसाठी अनुकूल आहे. फेक नरेटिव्ह आघाडी तयार करीत नाही. सूत्र म्हणजे फेक नेरीटिव्ह असतो, असं संजय राऊत म्हणालेत.

अनिल गोटेंसोबतच्या भेटीवर राऊत काय म्हणाले?

माजी आमदार अनिल गोटे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत मुक्कामी असलेल्या गोल्डन लिफ हॉटेलमध्ये अनिल गोटे यांची राऊत यांच्याशी चर्चा केली. बंद खोलीत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. वीस मिनिटे या दोन नेत्यांमध्ये संवाद झाला. विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची राऊत यांनी माहिती दिली आहे. अनिल गोटे महत्वाचे नेते आहेत. ते आजारी होते. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. अशावेळी राजकीय चर्चा निश्चितपणे होते. ती चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात संजय राऊत आणि अनिल गोटे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 05-10-2024