चिपळूण : रस्त्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा अपघाती मृत्यू

चिपळूण : शहरातील लाईफकेअर हॉस्पिटल परिसरात बुधवारी रात्री १२.३० वाजता झालेल्या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला जात असताना हा प्रकार घडला. साहिल जयंत कासार (२५, खंड कांगणेवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. साहील व त्याचे मित्र वेगवेगळ्या दुचाकींवरून शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला जात होते. यावेळी चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी मोरीत घुसली. यातच त्याचा मृत्यू झाला.

याची माहिती कांगणेवाडी येथील त्याच्या मित्रांनी दिल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. साहीलवर गुरुवारी रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडील जयंत कासार हे नगर परिषदेत बांधकाम विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:06 PM 15/Mar/2025

Shanti2