खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात बालकांसाठी आरोग्य सेवा शिबिर

खेड : खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल संस्था कार्यक्रम आरोग्य संदर्भसेवा आरोग्य सेवा शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात खेड तालुक्यातील ०-१८ वयोगटातील विविध आजारग्रस्त बालकांवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत तपासणी व उपचार तसेच आवश्यक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे शिबिर १८ मार्च रोजी होणार आहे. तसेच अंगणवाडीतील कुपोषित बालकांना खेड रोटरी क्लबमार्फत मोफत प्रोटिन पावडर, टॉनिक तसेच अन्य औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. आजारी बालक तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या बालकांसाठी हे शिबिर मोफत आहे. संबंधितांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 17/Mar/2025

Amey jwelrs