ब्रेकिंग : पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 18 हप्ता मिळण्यास सुरुवात

मुंबई : शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या 18 हप्त्याची वाट पाहात होते. दरम्यान, आज (5 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 18 व्या हप्त्याच्या वितरणास प्रारंभ करण्यात आला.

नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वाशिममध्ये असताना त्यांनी या 18 व्या हप्त्याच्या वितरणास प्रारंभ केला.

9.4 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक वर्षात एकूण 6000 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. शेतकरी या पैशांचा उपयोग पेरणी, कापणी तसेच शेतीच्या अन्य कामांसाठी करतात. आता शेतकऱ्यांना 18 व्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. देशभरातील 9.4 कोटी शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याच्या वितणासाठी केंद्र सरकारने एकूण 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ई-केवायसी करणे गरेजचे

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी देशभरात कोट्यवधी शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे वर्ग होत नाहीत. बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे पैशांचा हा लाभ मिळण्यास अडचणी येतात. म्हणजेच बँक खाते आधार क्रमांकाला लिंक असेल तरच शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून केले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:01 05-10-2024