प्रज्ञाशोध परीक्षेत पालीचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

पाली ( वार्ताहर) : जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्याच्या गुणवत्ता यादीत आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ या शाळेच्या विद्यार्थीनी वेदा योगेश सावंत व विधी किशोर सावंत दोघीही इयत्ता चौथी यांची प्रज्ञाशोध निवड परीक्षेत निवड झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.जनार्दन मोहिते, शिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव, मारुती घोरपडे, श्रुती वारंग यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामचंद्र गराटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, अ‍ॅड. सागर पाखरे, श्रीकांत राऊत यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:22 17-03-2025