रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील आंबा बागेत काम करणाऱ्या एका नेपाळी महिलेने अज्ञात कारणातून विष प्राशन करत आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. १५ मार्च रोजी रोजी दुपारी २.३० वा. सुमारास घडली. उर्मिला मायाराम लोनिया (४०, सध्या रा. सैतवडे मुळ रा. नेपाळ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
उर्मिला ही पतीसह सैतवडे येथील वसिम शेखासन यांच्याकडे राहायला असून तिचा पती आंबा बागेत कामाला होता. शनिवारी दुपारी उर्मिलाचा पती मायाराम हा जेवण केल्यानंतर २.३० वा. मालकाच्या बागेत कामाला गेला होता. सायंकाळी ४ वा. मालक वसिम शेखासन यांनी मायारामला फोन करुन तुझ्या पत्नीने आंबा फवारणीचे औषध प्राशन केल्याचे सांगून तिला खंडाळा येथील सरकारी दवाखान्यात नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ७ वा उर्मिलाला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 19/Mar/2025














