संगमेश्वर : राजवाडी येथील भवानगडावर स्वच्छता अभियान

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील भवानगडावर स्वराज्य संस्था कोकणच्या वतीने बुधवारी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वराज्य संस्थेचा सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकीने स्वराज्य संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. ग्रामस्थांच्या समस्या हेरून त्या सोडविणे, मदतीला धावून जाण्यासाठी सदैव सज्ज असतात. स्वराज्य संस्था कोकणच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्री उत्सवाच्या आधी श्री क्षेत्र भवानगडावर साफसफाई करून श्रमदान करण्यात आले. यावेळी स्वराज्य संस्था कोकण संस्थापक अध्यक्ष अविनाश गुरव, चैतन्य रेडीज, प्रथमेश कडवईकर, सोहम नाखरेकर, किरण कडवईकर, ऋग्वेद कडवईकर, सोयम कडवईकर, भावेश कडवईकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 05/Oct/2024