चिपळूण : तालुक्यातील एका शाळेतील शिक्षिकेविरूद्ध ग्रामस्थ पालक आक्रमक झाले असून आठ दिवसांत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या शिक्षिका विद्यार्थ्यांना सतत मारझोड करतात, पालक सभेत शाळेबद्दल त्या बेफिकीरपणे बोलतात, मारल्याचे घरी पालकांना सांगितले तर पुन्हा यापेक्षा जास्त मार देईन, अशी धमकी विद्यार्थ्यांना देतात असा आरोप करत पालकांनी या शिक्षिकेविरोधात निवेदन दिले.
तालुक्यातील एका शाळेमध्ये चार शिक्षक असून, त्यापैकी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना सतत मारझोड करतात. एका मुलीला त्यांनी अनेकवेळा मारझोड केली. ती मुलगी घरी आल्यावर तिचे खांदे सुजले होते. हे कशामुळे झाले, याची माहिती पालकांना शेजाऱ्यांकडून कळली. याबाबत मुलगीने नेहमीच बाई वर्गात मारतात आणि घरी सांगू नका. नाहीतर, यापेक्षा जास्त मार देईन, असे सांगितले. दुसऱ्या पालकाच्या मुलाला शाळेमध्ये त्या शिक्षिकेने मारझोड केली. त्यावेळी ग्रामस्थांनी या शिक्षिकेला समज देऊन वाद मिटवला. आणखी एका मुलीला सहा महिन्यापूर्वी मारझोड करण्यात आली होती. याबद्दल तिच्या पालकांनी शिक्षकेस विचारणा केल्यावर त्यांनी मुलीला शाळेत पाठवायचे असेल तर पाठवा नाहीतर घरी ठेवले तरी चालेल, असे सांगितल्याचा आरोप पालकांनी केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 21/Mar/2025














