संगमेश्वर : संगमेश्वर येथील सोनवी नदीपात्रालगत असलेल्या पावटा मैदानात सुमारे ४० ते ४५ वय वर्षे असलेल्या पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. संगमेश्वर येथील पावटा मैदानात सोमवारी (ता. १७) हा प्रकार निदर्शनास आला. मृताचा चेहरा गोल, रंग सावळा, काळे-पांढरे केस, पुढील भाग टक्कल, काळी-पांढरी दाढी असा असून; अंगात निळा पांढरा चौकडीचा फुल शर्ट आणि काळ्या रंगाची फूल पॅन्ट आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी कोणालाही काही माहिती असल्यास पोलिस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 21/Mar/2025













