लांजा : भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

लांजा : लांजा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करा. कार्यालयीन कामकाजाची सखोल चौकशी करा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत लांजा शहर समन्वय समितीने लांजा तहसीलदार यांना निवेदन दिले.

लांजातील भूमी अभिलेख कार्यालया विरोधात गेले वर्षभर तीव्र नाराजी उमटत आहे. याविरोधात मंगळवारी लांजा शहर समन्वय समितीने लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांची भेट घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळणाऱ्या असुविधांबाबत चर्चा केली व निवेदन तहसिलदार कार्यकर अधिकारी दिले.

या निवेदन म्हटले आहे की, कार्यालयात पुरेशा कर्मचारी अभावी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. नागरिकांची कामे अनेक महिना पडून आहेत. अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे, नकाशे कार्यालयातून गहाळ होतात.

जमीन मोजणीच्या कामांना तारखा दिल्या गेल्या नाहीत. कार्यालयात आलेल्या नागरिकांना योग्य माहिती अगर सूचना दिली जात नाही. कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार केल्याच्या तक्रारी सुद्धा आहे. त्यामुळे या कार्यालयाबाबत लोकांच्या मनात रोष आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची योग्य ती चौकशी करण्यात यावी व लोकांच्या तक्रारीबाबत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत तक्रारदार नागरीकांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 21/Mar/2025