‘पावसाळ्यापूर्वी पावस बाजारपेठेतील रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याची मागणी

पावस : पावस गोळप पूल ते बाजारपेठ मार्गे पावस चौक या रस्त्यावर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन अद्यापही पुरे न झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अरुंद रस्त्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक बंद आहे. दोन-तीन वर्षानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जाते; परंतु गटार नसल्याने दरवर्षी खड्ड्याचे प्रमाण वाढत आहे. त्यावरती उपाय म्हणून बाजारपेठेतील हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करावा, अशी मागणी करण्यात आली. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर हा रस्ता सिमेंट काँक्रीट चा करण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने काँक्रीटीकरण काम सुरू होईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे म्हणाले की, बाजारपेठ मार्गे रस्ता सर्वांना जवळचा व सोयीचा आहे. लोकप्रतिनिधीनी दिलेले आश्वासन पुरे केल्यास हा रस्ता सर्वांना सुखकारक होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 21/Mar/2025