Breaking : मुंबईहून निघणारी कोकण कन्या एक्सप्रेस आज चार तास उशिराने सुटणार

मुंबई : कोकण रेल्वेची मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस उशिराने धावत असल्याने आज मुंबई येथून गोव्याच्या दिशेने येणारी कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल चार तास उशिराने सुटणार आहे. सीएसटी स्टेशन वरून गोव्याच्या दिशेने धावणारी कोकण कन्या एक्सप्रेस आज दिनांक २२ मार्च २०२५ रोजी रात्री अकरा वाजता आपल्या नियोजित वेळेनुसार सुटण्याऐवजी उद्या पहाटे तीन वाजता सुटणार आहे. अशी माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून मिळत आहे. याबाबतचे मेसेज देखील प्रवाशांच्या मोबाईलवर पाठवण्यात आले आहेत.