चिपळूण : कोकणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या किडीमुळे आंबा पिकांमध्ये २५-३० टक्के नुकसान होते. फळमाशी फळाच्या सालीखाली अंडी घालते. दोन ते तीन दिवसात अंडी उबवून आळ्या फळातील गर खातात. किडलेली फळे गळून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जाऊन आर्थिक नुकसान होत आहे.
या किडीची अळी अवस्था ही सर्वात जास्त नुकसानकारक असते. याचा प्रादुर्भाव हा फळाच्या सालीच्या आत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कीटकनाशक पोहचत नाही. त्यामुळे फवारणी द्वारे नियंत्रण न करता नियंत्रणासाठी कामगंध सपळ्याचा वापर प्रभावी ठरतो.
हे नुकसान नियंत्रित करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत एकात्मिक कीड व्यवस्थापन अंतर्गत प्रति हेक्टरी ४ रक्षक सापळे वेगवेगळे ठिकाणी बागेत लावण्याची शिफारस केली आहे. रक्षक सापळ्यामध्ये फळ माशीच्या नरांना आकर्षित करणारा मिथाईलं यूजीनॉल नावाचा कामगंध वापरला जातो. हा कामगंध कापसाच्या बोळ्याला लावून रक्षक सापळ्यामध्ये ठेवला जातो.
या कामगंधामुळे आंबा बागेमध्ये असलेले फळ माशीचे नर सापळ्या कडे आकर्षित होतात व त्यामध्ये अडकून मरतात. यामुळे फळमाशीचे पुढील प्रजोत्पादन थांबते व फाळमाशी चा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो. यास्तव सिंधूरत्न योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यामध्ये आंबा बागेतील फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी रक्षक सापळे व ल्यूर्सचा पुरवठा करण्यात आला आहे.
शेतकरी बांधवांनी याकरिता संबंधित गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत आहे करण्यात येत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 PM 25/Mar/2025
