किरण सामंत यांच्या मागणीची दखल
रत्नागिरी : डिजिटल इंडियाच्या युगात जवळपास सर्वच सामाजिक आणि आर्थिक व्यवहार इंटरनेटवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, लांजा- राजापूर भागातील नागरिक खराब मोबाईल नेटवर्कमुळे प्रचंड त्रस्त होते. या समस्येबाबत सिंधुरत्न योजनेचे सदस्य आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत यांनी आवाज उठवला होता. या मागणीच्या आधारे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिलायन्स जिओ कंपनीला पत्र पाठवून या भागातील नेटवर्क सुधारण्याची विनंती केली होती.
किरण सामंत यांच्या मागणीच्या आधारे, जिओचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आणि उपाध्यक्ष सुनील गोसावी आणि उप महाव्यवस्थापक नितीन कुमार जैन यांनी सामंत यांच्याशी चर्चा केली आणि लांजा-राजापूर भागातील नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या भागात प्राथमिक सर्वेक्षण होऊन जिओ अधिकचे टॉवर उभारून नेटवर्क सुधारण्यात येणार आहे.
पाठपुराव्यामुळे लांजा-राजापूर भागातील नागरिकांना जलद इंटरनेट सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिजिटल इंडियामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार इंटरनेट शिवाय पूर्ण होत नाहीत, खराब नेटवर्कमुळे या भागातील नागरिकांचा दैनंदिन जीवनात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आर्थिक व्यवहार करताना अडचण येत होती. मात्र, किरण सामंत यांच्या पुढाकारामुळे लांजा-राजापूर भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 07/Oct/2024