गुहागरमधील रेशन दुकानदारांचे ६ महिने ‘कमिशन’ रखडले

गुहागर : तालुक्यातील सुमारे ७० रेशन दुकानदारांचे कमिशन गेले ६ महिने रखडले आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खोली भाड्यासह धान्य वितरणासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आहे. आणखी किती महिने कमिशनविना काढायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल धान्यामागे जे काही कमिशन मिळते त्यातूनच धान्य वितरणासाठी लागणारी स्टेशनरी, रोजगार सांभाळावा लागतो. शिवाय अनेक दुकाने भाड्याच्या खोलीत आहेत. त्यामुळे त्यांना दर महिन्याला भाडे सुद्धा द्यावे लागते.

या सर्व बाबी सांभाळत असताना वेळेवर कमिशन मिळत नसल्याने रेशन धान्य दुकानचे चालक आर्थिक संकटात आल्याचे दिसून आहे. यामुळे कमिशन लवकरात लवकर मिळण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून होत आहे. मात्र अन्न पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांचे कमिशन काढण्यासाठी दिरंगाई का होते, याबाबतचा उलगडा झालेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 28/Mar/2025