राजापूर : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाथर्डे येथील सार्थक संजय मांडवकर आणि पार्थ महेश चव्हाण दोन्ही ५ वी या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशामागे शाळेतील शिक्षकवृंद व त्यांच्या वर्गशिक्षिका काडगे आणि शाळेचे मुख्याध्यापक गिरकर यांचा मोलाचा वाटा आहे.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे यश मिळविल्यासाठी दोन्ही विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर पासून जोरदार सुरवात केली होती. शनिवार, रविवारही सुट्टी न घेता सर्व शिक्षकांच्या मार्ग दर्शनाखाली अभ्यास करुन यश मिळविले. या त्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि केंद्रप्रमुख यांनी विद्याथ्याचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 28/Mar/2025
