पावस येथे आंबा-काजू पिके धोक्यात; नुकसान भरपाईची मागणी

गावखडी : वातावरणातील कमालीचा बदल व प्रदूषणकारी प्रकल्प त्यात कडाक्याचे ऊन या लहरी हवामानामुळे कोकणातील आंबा काजू पीक धोक्यात आले असून कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे.

यावर्षी हवामानात मोठा बदल जाणवत असून मध्यंतरी थंडीचा वाढलेला कडाका त्यानंतर अचानक हवेत उष्णतेची लाट त्यामुळे आंबा काजूला योग्य मोहर आलेला नाही त्यातच आलेला मोहर उष्णतेच्या लाटेमुळे करपून गेला व त्याला लागलेली छोटी कैरी सुद्धा गळून पडली सततच्या बदलामुळे आंब्याला आलेला मोहर काळा पडला असून त्याचा परिणाम आंबा व काजू वर मोठ्या प्रमाणात झाला परिणामी पिकावर मोठी संक्रात आली असून फळधारणा झाली नाही झाडांवर सुकलेला मोहर गळालेली कैरी काजूचा मोहर बुरशी येऊन झाडावरच काळा पडला आहे त्यातच शेतकऱ्यांनी फवारणी केलेली वाया गेली असून आर्थिक भुर्दंड पडला आहे.

शेतकऱ्यांनी वापरलेली फवारणीचे औषधे त्याचे पैसे कसे उभे करायचे याच्या विवंचनेत आहेत एकंदरीत पावस विभागातील शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंबा पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष पोकडे यांनी केली आहे तसेच या विभागात एका प्रदूषणकारी कंपनीचे परिणाम आंबा काजूंना सहन करावे लागत असून त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे अशा प्रदूषणकारी कंपनीची चौकशी करून त्यांचे आंबा काजूला हानिकारक प्रदूषण रोखून कारवाई करावी असे पावस विभागातील शेतकरी बोलत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 28/Mar/2025