चिपळूण : सावर्डे विद्यालयात स्वच्छता मोहीम या विषयावर पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन

सावर्डे : स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत सावर्डे विद्यालयात पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहीम या विषयावर विद्यार्थ्यांनी पेंटिंग केले. कलाशिक्षक व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांनी रंग निर्मिती कशी करावी व प्रत्यक्ष रंगकाम करताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली. पेंटिंगमधून विद्यार्थ्यांनी सृजनशीलता व नावीन्यपूर्णता चित्राद्वारे प्रकट केली. शालेय परिसर, बाजारपेठ, बस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्वच्छतेचे महत्त्व व जीवनातील स्थान आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेबद्दलच्या परिकल्पना काय आहेत, याची जाणीव करून घेण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 07/Oct/2024