रामपूर : चिपळूण-गुहागर रोडवर शृंगातळी, चिखली, गेमवी, देवघर मार्गताम्हाणे, चिवेली फाटा, घोणसरे, गुढे फाटा रामपूर, रामपूर हॉस्पिटल, तांबी, मालघर, निर्हाळ, पाचाड, कोंढे या ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोकाट गुरे रस्त्यावर फिरतात. रस्त्यात वाहनांना अडथळा होतो.
अपघात छोटे-मोठे होतात. त्याला कुठेतरी बंधन पाहिजे. शेतकरी आपली गुरे मोकाट सोडतात. गुरांना मोकळी सोडल्याने खाण्यास काही नाही. प्लास्टिक पिशव्या खातात. त्याचा दुधावर परिणाम होतो. शेतकऱ्यांनी मोकाट गुरे सोडू नये, अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 29/Mar/2025














