ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

चिपळूण : सायंकाळ होताच लहान सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले होते. महिनाभर अन्न, पाण्याचा त्याग करून रोजे ठेवणाऱ्या लहान मुलांना ईदच्या चंद्रदर्शनाची जास्त आतुरता दिसत होती. काल परदेशात ईद साजरी वृंद करण्यात आली. त्यामुळे भारतात सोमवारी (ता. ३१) ईद होणार हे निश्चित मानले जात आहे.

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान पर्व अंतिम टप्प्यात आला आहे. मशिदींमध्ये तराविहच्या नमाजवेळी अलविदापठण होत आहे. ईदच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. गुढीपाडव्याच्या दिवशी आणि ईदच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी उफळून आली होती. त्यामुळे सामाजिक ऐक्याचे वातावरण दिसून येत होते.

ईदच्या दिवशी तयार केल्या जाणाऱ्या शिरखुर्मासाठी सुकामेवा, शेवईसह कपडे, अत्तर, टोप्यांची दुकाने सजली आहेत. देशभरात ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम समुदायातील लोकांचा हा सर्वात मोठा सण आहे. ईद उल फित्रला ‘मीठी ईद’ असेही म्हणतात कारण या दिवशी लोक गोड पदार्थ बनवतात आणि खातात आणि सर्वांना वाटतात.

यावर्षी रमजान महिना २ मार्च २०२५ पासून सुरू झाला. २९ व्या उपवासानंतर सोमवारी (ता. २१) रमजान ईदचा सण साजरा केला जाईल. शहरात रमजानसाठी शेवया, कपडे सुकामेवासह विविध वस्तूंनी बाजारपेठे सजली असून महिलांचा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर उपलब्ध असून सुरम्याची मोठी मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 31/Mar/2025