रत्नागिरी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मित्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलने यश मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीत झाले. मिस्त्री हायस्कूलच्या सुलताना भाटकर यांनी माध्यमिक गटात भाषा विषयात तालुकास्तरावर प्रथम तर जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.
इम्तियाज सिद्दीकी यांनी माध्यमिक गटात विज्ञान विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते विजेते स्पर्धकांना सन्मानचिन्हे, प्रमाणपत्रे व धनादेश देऊन गौरविण्यात आले. शाळा व संस्थेचे पदाधिकारी हमीद मिस्त्री, निसार लाला, तन्वीर मिस्त्री, जाहिर मिस्त्री, शकील मजगांवकर, इकबाल मिस्त्री, रफीक मुकादम, साबीर मजगांवकर, झुबेर गडकरी, मुश्ताक आगा यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 01/Apr/2025













