रत्नागिरी : जिल्ह्यात तुरळक पाऊस

रत्नागिरी : जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे सावट अजूनही कायम आहे. सोमवारी रात्री काही ठिकाणी तुरळक पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. यामुळे उष्णतेमध्येही कमालीची वाढ झाली आहे. त्याचबरोबर आंबा पीकसुद्धा धोक्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जाहीर केला आहे. साधारण अजून दोन दिवस अशीच स्थिती असणार आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी रात्री मात्र काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 02-04-2025