चिपळूण : वाशिष्ठी नदी पूररेषेतच मातीचा भराव

चिपळूण : वाशिष्ठी नदीजवळ पूररेषेत मातीचा भराव केला जात आहे. दरम्यान, काढलेला मातीचा भराव कळंबस्ते येथील खासगी जागेत टाकला जात आहे. मात्र, भराव टाकण्यात असलेली जागा पूररेषेत असल्याने त्याला कळंबस्ते ग्रामपंचायतीने अटकाव केला आहे.

यासंदर्भात या ठेकेदारासह महामार्ग विभागाला भराव न टाकण्यासंदर्भातील पत्र सादर केले आहे. ग्रा. प.ने घेतलेल्या हरकतीनंतर सद्यस्थितीत भरावाचे काम बंद करण्यात आले आहे. पूररेषेतील भरावाला विरोध एकीकडे पूररेषेत कुठलीही बांधकामे करू नयेत, मातीचे भराव करू नयेत, अशी नियमावली प्रशासनाकडून दाखवली जात असताना दुसरीकडे खासगी जागेत आणि तेही पूररेषेत भराव कसा टाकला जातो, प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 02/Apr/2025

Tata nexon