राजापूर : आगामी काळात शेतीशिवाय पर्याय नसल्यामुळे शेती करावीच लागणार आहे; मात्र रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी नापिक बनत चालल्या आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीने शेती करण्यासाठी जमिनीची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे विशेषतज्ञ डॉ. सुदेशकुमार चव्हाण यांनी केले.
रासायनिक खतांऐवजी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शहराजवळील हर्डी येथे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी मंत्रालय भारत सरकार यांच्या सौजन्याने एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प आणि भारतीय शेती पद्धती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पिक पद्धती बदलाचा पथदर्शी प्रकल्प शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर गावप्रमुख पंढरीनाथ जड्यार, गजानन जड्यार, राजाराम मेस्त्री, शशिकांत जड्यार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे डॉ. विनय सागवेकर, डॉ. सुनील धवाले, शेतकरी उपस्थित होते. डॉ. चव्हाण म्हणाले की, शेतीच्या मातीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
शेती करण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे असून, निसगनि आपल्याला भरभरून दिले आहे; परंतु आपण निसर्गाच्या विरुद्ध चाललो आहोत त्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. यावेळी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 02/Apr/2025














