चैत्र पालवीने निसर्ग बहरला

संगमेश्वर : चैत्र पालवीची गंमत म्हणजे निव्वळ हिरवा रंगदेखील खुलून दिसतो. वसंत, चैत्र महिना म्हणजे कडक उन्हाळ्याची वाटले तरी रणरणते ऊन, धगधगता सूर्य, उष्मा, पाण्याच्या ओलाव्याचा पत्ताही नसतो. त्यातही नवजात कोवळी पालवी, वेली, फुलझाडे, कशी टिकणार?, परंतु फुलझाडे, शोभेची झाडे पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातसुद्धा टवटवीत राहून निसर्गप्रेमींना आनंद देत आहेत.

सध्या जिकडे पाहावे तिकडे निसर्ग बहरून आल्याचे दिसून येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली ब्राह्मणवाडीतील विवेक पाध्ये यांनी घराशेजारील जागेत बाग फुलवली आहे.

त्यात फुलझाडे, शोभेची झाडे, दूर्वा, बेल, शमीपत्रे, तुळशी अशी असंख्य झाडे आहेत. त्याची ते नेहमी काळजी घेतात. न चुकता पाणी देऊन फुलबाग अगदी टवटवीत ठेवली आहे. त्यांची ही बाग उन्हाळ्यातही बहरलेली पाहून वेगळा आनंद व समाधान मिळते. अशा प्रकारे सौंदर्याने नटलेल्या सुंदर कोकणात चैत्रातही निसर्ग जणू विविध रंग, गंध यांनी बहरून जातो. हे दृश्य कोकणात जागोजागी पाहायला मिळत आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 03/Apr/2025