राजापूर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुका भाजपाच्या वतीने गुरूवार १० एप्रिल रोजी राजापूर हायस्कुलच्या पटांगणावर लोकसभा मतदार संघ मर्यादित भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांनी दिली आहे.
यानिमित्ताने राजापूरात प्रथमच हॉलीबॉलचा जिल्हास्तरीय थरार पाहायला मिळणार आहे. खासदार नारायण राणे याचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा होत असतो. त्याप्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात भव्य हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता राजापूर हायस्कुलच्या पटांगणावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर यांच्या नेतृत्वाखाली राजा काजवे, जब्बार काझी, आशिष मालवकर व श्री. हसोळकर या स्पर्धेच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 03/Apr/2025














