चिपळूण : बोधगया बिहार येथील महाबोधी महाविहार हे समस्त जगातील बौद्ध धर्मीयांचे पवित्र श्रद्धास्थान आहे; मात्र हे श्रद्धास्थान बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसल्याने दीर्घकाळापासून त्यांचा मुक्ती लढा सुरू आहे. हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी जगभरातील बौद्ध भिक्षूनी आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनास रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाच्यावतीने सक्रिय पाठिंबा दर्शवण्यासाठी ९ एप्रिलला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ मुंबई व रत्नागिरी (ग्रामीण) यांची संयुक्त सभा नुकतीच चिपळूण येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे महासंघाचे सभापती वि. ल. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी महासंघाचे अध्यक्ष विठोबादादा पवार, सरचिटणीस चंद्रकांत तांबे, खजिनदार देशराज तांबे यांच्यासह चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.
सभेत रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाची ग्रामीण कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यानुसार महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रितम रूके (दापोली), सरचिटणीसपदी संदेश पवार (चिपळूण), खजिनदारपदी विलास शिंदे (खेड) यांची निवड करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 03/Apr/2025














