गणपतीपुळे : प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण खूप महत्त्वाचे असते. शिक्षणाने सर्व गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाच्या प्रवाहात राहून स्वतःला घडवत मोठे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आप्पा धनावडे यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘जाणू लोकांना, अनुभवू लोकांना आणि समृद्ध करू स्वतःला’ या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित असणारे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सुर्वे यांनी शाळेच्या आश्वासक प्रगतीचे कौतुक करताना अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 03/Apr/2025














