माखजन : विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवावा यासाठी ५ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व हेतू साध्य व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी शाळा भेटींना सुरूवात केली आहे. याअंतर्गत सुवर्णा सावंत यांनी गणपतीपुळे मराठी शाळा, व मालगुंड हायस्कुल ला भेट दिली. प्रत्यक्ष ३ री व ५ वीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांची क्षमता जाणून घेतली. यामध्ये काही विद्यार्थी प्रगत असल्याचे आढळले तर काही चुका करताना आढळले.
यावेळी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत गणित समजून, गणित विषयाची रुची निर्माण व्हावी यासाठी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी रंजक तासिका ही घेतली. व विद्यार्थ्यांकडून अधिक सराव घेऊन निपुण महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.
५ एप्रिल रोजी सर्व शाळांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम घेण्यासाठी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी आदेशित केले आहे. ५ मार्च च्या शासन निर्णयास अनुसरून, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक अनुदानित, अंशतः अनुदानित स्वयंअर्थसहाय्यीत , सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये चावडी वाचन घेण्यात यावे असे सूचित करण्यात आले आहे. विशेषतः हे चावडी वाचन इयत्ता ५ वी साठी असणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 03/Apr/2025














