चिपळूण : व्हिएतनाम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत चिपळूण येथील कोवॅसच्या स्वरुप खेराडे याने सुवर्ण तर पूजा लढ्ढाने रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारताला सर्वाधिक पदके मिळाली आहेत.
कोलकाता येथील ऑल इंडिया योगा फेडरेशनतर्फे पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत कोवॅसच्या पूजा लड्ढा व स्वरुप खेराडे यांनी वेगवेगळ्या गटात रौप्य पदके मिळवल्याने त्यांची या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत देशातील ३५ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत ६ ते १० मुलांच्या वयोगटात स्वरुप खेराडे याने सुवर्णपदक तर २३ ते ४० या महिलांच्या गटात पूजा लढा हिने रौप्यपदक पटकावले.
या स्पर्धेसाठी नगर परिषदेने महिला व बालविकास विभागांतर्गत पूजा लढाला सहकार्य केले होते. या यशाबद्दल पूजा लढा व स्वरुप खेराडे या दोघांचे कोवॅसचे कार्यकारिणी सदस्य, माजी खासदार हुसेन दलवाई, चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, महिला व बालविकास विभागाचे प्रमुख प्रसाद साडविलकर, अध्यक्ष सुमती जांभेकर, आदिती देशपांडे, दीप्ती लाड, शमा दलवाई, सुहास पवार, मधुकर पवार यांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 05/Apr/2025














