रत्नागिरी : मिरजोळे एमआयडीसीत जागोजागी कचऱ्याचे ढीग

रत्नागिरी : रत्नागिरी एमआयडीसी मध्ये रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. या भागात राहणारे नागरिक त्याचप्रमाणे उद्योजक यांच्या आरोग्याची काळजी महायुती सरकार घेणार आहे की नाही असा सवाल रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी उपस्थित केला आहे.

रत्नागिरीतील मिरजोळे १४ एमआयडीसी परिसरामध्ये जिकडे जाशील तिकडे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. हा कचरा कोण टाकतो याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे होते. त्याचप्रमाणे फिनोलेक्स कॉलेज ते नवलाई आर एम सी या दरम्यान मुख्य रस्त्यावर एक पूल बांधण्यात आला आहे त्यामुळे त्या ठिकाणी असलेले गटार पूर्णपणे पाण्याने भरून गेले आहे. त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झालेली आहे.

मिरजोळे एमआयडीसी परिसरामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला प्लास्टिकच्या बाटल्या तसेच अन्य प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्यामुळे या भागातील नागरिकांसाठी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे महायुतीचे सरकार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पर्यंत प्रत्यक्षात किती उद्योग आले हा मोठा प्रश्न आहेच. परंतु विद्यमान मिरजोळे एमआयडीसी भागांमध्ये जे काही उद्योजक आहेत त्याचप्रमाणे तिथे जे काही लोक राहत आहेत. जागोजागी ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे मात्र प्रत्यक्षात असं काही होत नाही. त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 07/Apr/2025

Happy journey marathi