संगमेश्वर : तालुक्यातील देवरुखजवळील बेलारी बुद्रुक येथील प्रकृतिका फार्म्सचे आधुनिक शेतकरी अनुप दिघे आणि नीलिमा दिघे यांनी आपल्या सेंद्रिय हापूस आंब्याची विक्री रामनवमीच्या दिनी सुरू केली. या मुहूर्तावर झालेल्या बोलीत ५ डझन आंब्यांना विक्रमी ७ हजार ५०० रुपये किंमत मिळाली.
या मानाच्या पेटीचे भाग्यवान बात खरेदीदार ठरले देवरुखमधील प्रतिष्ठित नागरिक मदन मोडक. या मुहूर्ताच्या बोलीचे आयोजन क्रांती व्यापारी यांनी साईनाथ कोल्ड्रिंक्स हाऊस येथे सकाळी १० वाजता केले होते. ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमास हेमंत तांबे, मुन्ना थरवळ, मोहन वनकर, नाना कोळवणकर, अभिजित शेट्ये, विलास शेलार, प्रमोद शेलार, राजू घोसाळकर, प्रवीण जागुष्टे, योगेश केदारी, महेंद्र कांगणे, प्रदीप जागुष्टे आदी उपस्थित होते. रामनवमीनिमित्त आंब्याच्या पेटीची पूजा करून श्रीराम चरणी वंदन करून सुरू झालेल्या लिलावात लागलेल्या विक्रमी बोलीमुळे देवरूख आणि सह्याद्री दऱ्याखोऱ्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.
विशेषतः बेलारीसह कुंडी, निगुडवाडी, तामनाळे, निवेखुर्द, आंगवली, कासारकोळवण, बोंड्ये, मारळ, बामणोली, खडी कोळवण आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सेंद्रीय हापूस आंबा उत्पादनाची प्रेरणा मिळाली आहे. देवरूख बाजारातील या यशस्वी विक्रीमुळे शेतकरी आपल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत आणण्यास उत्सुक आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 07/Apr/2025














